Nashik Congress : काँग्रेसच्या बॅनरवर आमदार हिरामण खोसकरांचा फोटो नसल्यानं चर्चा
Nashik Congress : काँग्रेसच्या बॅनरवर आमदार हिरामण खोसकरांचा फोटो नसल्यानं चर्चा
हेही वाचा :
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्र सरकारच्या वतीनं Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना उच्चस्तरीय सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा कवच देण्याची शिफारस केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं त्यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली आहे. दरम्यान, शरद पवारांनी मात्र, त्यांना देऊ केलेल्या Z+ सुरक्षेवरुन संशय व्यक्त केला आहे. मला दिलेली सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना नुकतीच केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा देऊ केली आहे. पण, शरद पवारांनी मात्र, केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केला आहे. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असं शरद पवार म्हणाले आहेत. निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था : शरद पवार केंद्र सरकारनं देऊ केलेल्या झेड प्लस सुरक्षेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "काल माझ्याकडे केंद्रातील गृहखात्याचे एक अधिकारी आले. कदाचित निवडणुका आहेत. निवडणुकांसाठी मी सगळीकडे फिरणार, त्यामुळे निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था असू शकते, बाकी मला काही माहिती नाही." महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेला तणाव हे शरद पवारांच्या सुरक्षा वाढवण्यामागचं कारण असू शकते, असं मानलं जात आहे. आणि त्यामुळेच केंद्र सरकारनं शरद पवार यांचे विधानसभा निवडणुकीचे दौरे लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याआधीच शरद पवारांना देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा यामुळे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू होत्या. अशातच आता खुद्द थोरल्या पवारांनीच वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.