Sitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचय
जयदीप मेढे
Updated at:
13 Sep 2024 12:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचय
माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालंय.. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात येचुरी यांची प्राणज्योत मालवली.. ताप, अशक्तपणा जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.. पण उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं.. २०१५ साली त्यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती झाली होती.. एक सामान्य कार्यकर्ता ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव असा त्यांचा प्रवास राहिलाय.. डाव्या विचारसरणीशी ते आयुष्याच्या अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले..