Bhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने 'दादां'ना मोठा धक्का दिला आहे...भाग्यश्री आत्राम यांनी 'घड्याळ' सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत.. आपल्या लेकीने असा निर्णय घेतल्यास तिला आणि तिच्या सासरच्या मंडळींना नदीत फेकून देऊ, असा पवित्रा धर्मरावबाबांनी घेतला होता. मात्र भाग्यश्री आत्रामांनी वडिलांच्या भूमिकेला केराची टोपली दाखवत पक्षांतर केलं आहे. त्यामुळे बापलेक आमनेसामने आले आहेत...तसंच शरद पवार पक्षात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांनी वडिल धर्मरावबाबा आत्राम यांना थेट इशारा दिलाय.