Shirdi Potholes | मंत्र्यांसाठी खड्डे बुजवले, जनतेसाठी कधी करणार? मनमाड-अहमदनगर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य
मनमाड - अहमदनगर महामार्गाची गेल्या काही वर्षांपासून दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. शिर्डीला जोडणाऱ्या या रस्त्यावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ बघायला मिळते मात्र खड्डयांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून यावरून प्रवास करावा लागतोय. सत्ता बदलते, राजकारणी बदलतात, अधिकाऱ्यांचीही बदली होते मात्र हे रस्ते जैसे थे च राहतात. एकीकडे ही परिस्थिती असतांनाच दुसरीकडे नाशिक तालुक्यातील गंगापूर रोडची अशीच काहीशी अवस्था झाली होती, नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करून देखिल हे काम काही केल्या मार्गी लागत नव्हते मात्र रविवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार या मार्गावरून जाणार असल्याचं कळताच तातडीने दुपारपासून या मार्गावरील खड्डे बुजवले गेले त्यामुळे अजित दादांनी आता मनमाड - नगर महामार्गावरूनही प्रवास करण्याची गरज आहे.
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/b34de41f6673a0f612be050e2ed81af51738951976813718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Nashik | स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाशिककरांची तीव्र नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/7cf6ec55a07e0614bd1ad911dd8588301738865073762718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/c33dd45b4a63158f6b635dc1d8eb5065173786231772690_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/7de2d29607d17219e2e6183794c93da81736568516530718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/30/c077214dff91c8c17025ce0d123e56f31735548066382719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)