![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Selfie with Leopard Cub | लासलगावमध्ये स्थानिकांची नसती उठाठेव; बिबट्याच्या बछड्यासोबत सेल्फीसेशन
नाशिक : जिल्ह्यातील लासलगावमध्ये स्थानिक मजुरांनी बिबट्याच्या बछड्याला घेऊन सेल्फी काढल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकाराची सर्वत्र चर्चा सध्या सुरु आहे. वनप्राण्यांना हाताळताना काळजी घेण्याचं आवाहन अनेकदा वनविभागातर्फे केलं जातं. परंतु, नाशिकमध्ये मजुरांनी ऊसतोडणी करताना सापडलेल्या बछड्यासोबत चक्क फोटोसेशन केलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही केले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या असल्याचं वारंवार समोर आलं आहे. सध्या ऊस तोडणीचं काम सुरु आहे. अशातच निफाडच्या कुरुडगाव शिवारात ऊसतोडणी सुरु असताना, बिबट्याचा बछडा सापडला. मात्र ऊसतोड कामगारांच्या मुलांनी न घाबरता या बछड्यांना उचलून घेत त्यांच्या सोबत फोटो आणि व्हिडोओ काढत ते सोशल मिडीयावर व्हायरल केले. याप्रकारानंतर सर्वच स्तरांतून नाजारी व्यक्त केली जात असून हा सध्या चर्चेचा विषय बनलाय.
![Nashik Nale Safai : नाशिक शहरात नंदिनी नदी प्रदुषणात अव्वल, आरोग्याची गंभीर समस्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/e2953e90d1a7e8a76305a60d3a0f9a351718351741895718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rajendra Vikhe Patil : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून राजेंद्र विखे पाटील यांची माघार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/87b534144d93f7a7e8dfff445093a7c1171819414736990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manikrao Kokate : Ajit Pawar यांना सोडलं तर आमच्याइतके नालायक आम्हीच असू, कोकाटे यांचं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/f1e99484ca344943f3d819e436c05c6f1717836075847261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Bag Robbery : बाईकवरुन आले, सहा लाख पळवून नेले, चोरीची घटना CCTV मध्ये कैद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/02/10d9b6ab5e144a67eccd745150baec251717306554750261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Manmad Drought : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, हातपंपाजवळच करावा लागतोय मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/c791de899232ea817d38df7939ce22f01717075751954540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)