एक्स्प्लोर
Leopard | पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची सुटका | नाशिक | ABP Majha
निफाड तालुक्यातील सुंदरपुर परिसरातील काल एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या मादीच्या बछडयाला वाचवण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. पाण्याच्या शोधत ही मादी बछडा साहेबराव सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत पडली होती. ही बाब सकाळी त्या शेतकऱ्याच्या लक्षात आली. त्यावेळी शेतकऱ्यानं तातडीने याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडला.पिंजऱ्यात बिबट्या येताच त्याला वर काढून जंगलात सोडण्यात आलं.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















