Nashik Shivsena VS BJP : 47 कोटींच्या निधीसाठी भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई
Continues below advertisement
नाशिक शहरात सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालीये.. जागोजागी होर्डिंग्ज लावून कामाचं श्रेय घेतलं जातंय.. इंदिरानगर आणि राणेंनगर परीसरातील बोगद्याची लांबी वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 47 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यासंदर्भात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे होर्डिंग्ज शहरभर लावण्यात आले होते. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपनेही आमदार देवयानी फरांदे यांच्यासह माजी महापौर सतीश कुलकर्णी यांचे होर्डिंग्ज लावले..
Continues below advertisement