Nanded Love jIhad : नांदेडमध्ये लव्ह जिहाद विरोधातील मोर्चाला गालबोट , दुकांनावर दगडफेक :ABP Majha
नांदेड येथे लव्ह जिहाद विरोधात विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू राष्ट्रसेना या हिंदू संघटनांकडून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास नांदेड शहरातील सराफा चौरस्ता मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना ,जुना मोंढा टॉवर येथे मोर्चातील काही अतिउत्साही तरुणांनी या चौकातील फ्रेंड्स ड्रायफ्रुट कंपनी या दुकानावर दगडफेक केली. ज्यात सदर दुकानातील वस्तूंची, फलकाची तोडफोड करण्यात आली... त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होऊन, व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं... दरम्यान पोलिसांनी वेळीच दक्षता घेत पतिस्थिती आटोक्यात आणलीय.























