Nagpur | सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात दारू पार्टी करणारे कर्मचारी निलंबित
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर
Updated at:
20 Mar 2021 02:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर : नागपुरात गेल्या दहा दिवसांत 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या नागपुरात पोलिसांचे काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लकडगंज झोनच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या दारू व मटन पार्टी प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.