एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: राज्याच्या मंत्रिमंडळात OBC नेत्यांचं महत्त्व ताटातल्या चटणीएवढं: देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्य सरकार आपल्या अपयशाचं खापर मोदींवर फोडत असून राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आणि मराठा आरक्षण गेल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात आरक्षण देतो नाहीतर राजकीय संन्यास घेतो असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला दिलं आहे. 50 टक्क्यावरीलही आरक्षण आम्ही वाचवलं होतं,पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं असंही ते म्हणाले.

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं राज्यभरात जेलभरो आंदोलन सुरु आहे. नागपुरात व्हरायटी चौकात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्य सरकारने एक मागासवर्गीय आयोग नेमायचा होता आणि या आयोगाला इंम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी एक एजन्सी नेमायची होती. त्यानंतर ते एका अॅफिडेव्हीटच्या माध्यमातून न्यायालयात सादर करायचं होतं. त्यामुळे 50 टक्क्यांच्या आतलं सगळं आरक्षण वाचलं असतं. या सरकारने 15 महिने अॅफिडेव्हिटच सादर केलं नाही. यासाठी सात वेळा तारखा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्रातलं ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं. याला केवळ राज्य सरकारच जबाबदार आहे."

देशाच्या प्रत्येक राज्यात ओबीसींचे आरक्षण असताना राज्यातच का नाही असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला. राज्य सरकारला ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीच 15 महिने वेळकाढूपणा केला असल्याचा आरोप त्यांनी केला. पाच जिल्ह्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्यात आल्या आहेत, त्यामुळे भविष्यात ओबीसींना आरक्षणापासू वंचित ठेवण्याचा घाट घालण्यात आला आहे असंही ते म्हणाले. ओबीसी प्रकरणातील याचिकाकर्ता हा काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. 

ओबीसींचे आरक्षण परत आणू शकलो नाही तर मी राजकारणातून सन्यास घेईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मोर्चे काढण्यापेक्षा ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून आम्ही मदत करु असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 November 2026: आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Chandrakant Patil : सतेज पाटलांनी गोकुळमध्ये  मतचोरी केली; 13 संचालक कसे निवडून आणले? चंद्रकांतदादांनी मतांचं गणित सांगितलं
सतेज पाटलांनी गोकुळमध्ये  मतचोरी केली; 13 संचालक कसे निवडून आणले? चंद्रकांतदादांनी मतांचं गणित सांगितलं
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Chandrakant Patil : पुणे पदवीधरमध्ये भाजपचा पराभव कशामुळं झाला?  महायुतीच्या मित्रपक्षांची मदत मिळाली का? चंद्रकांत पाटील यांनी मविआच्या विजयाचं कारण सांगितलं...
पुणे पदवीधरमध्ये भाजपचा पराभव कशामुळं? चंद्रकांत पाटील यांनी कारण सांगितलं, मित्रपक्षांना क्लिन चीट... 

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget