एक्स्प्लोर
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांवर कथित गायरान जमीन घोटाळ्याचा आरोप, विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत...कथित गायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काल विरोधी पक्षनेते अजित पवारांसह विरोधकांनी केलीे... त्यामुळे मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.. वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केल्याचा आरोप अजित पवारांनी सत्तारांवर केलाय...दरम्यान काल अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर आज अब्दुल सत्तार सभागृहात काय उत्तर देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















