एक्स्प्लोर
Nagpur News : नागपुरात 49 कोटींचा घोटाळा, कंपनीच्या संचालकाला अटक, GST इंटेलिजन्स युनिटची कारवाई
बनावट पावत्या ( invoice ) आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावावर तब्बल 49 कोटी 19 लाखांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे प्रकरण नागपुरात उघडकीस आले आहे.
जीएसटी महासंचालनालयाच्या गुप्तचर विभागाने याप्रकरणी
एका कंपनीच्या संचालकाला अटक केली आहे..
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात जीएसटी मध्ये अवैधरित्या इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात याप्रकणी gst च्या इंटेलिजन्स युनिटने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली होती.
याप्रकरणी gst इंटेलिजन्स युनिटला गुप्त माहिती मिळाली होती की, आरोपी कंपनीने विविध शहरांत बांधकाम कराराची सेवा दिल्याचे खोट्या कागदोपत्रांच्या आधारे जीएसटी पोर्टलवर दाखल केले होते..
त्या आरोपी कंपनीचा जीएसटीआयएन नागपूर येथे नोंदणीकृत होता. त्या आधारे वेगवेगळ्या शहरांमध्ये शोधमोहीम सुरू झाली. जीएसटीआयएन दिलेल्या कंपनीच्या मालकांचा शोध घेत त्यांच्या प्रतिष्ठानांची झडती घेण्यात आली.
तपासादरम्यान कंपनीच्या जीएसटीआयएनचे अस्तित्व प्रत्यक्षात नसल्याचे दिसून आले. संपूर्ण कारभार हा बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरीच्या आधारे होत असल्याची बाब पुढे आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे...
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















