Mumbai Cruise Drugs : Fletcher Patel सोबत असणारी 'ती' लेडी डॉन ABP माझावर
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुन्हा एनसीबीवर (NCB) गंभीर आरोप केले आहेत. नबाव मलिक म्हणाले की, मी आर्यन खानला अटक केल्यानंतर दोन आरोपी कसे हँडल करताय प्रश्न विचारले होते? एससीबी कार्यालयात जातात कसे याबाबत प्रश्न विचारल्यानंतर एनसीबीने त्याबाबत खुलासा केला होता. फ्लेचर पटेल कोण आहेत? त्यांच्यासोबत झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबियासोबत माय लेडी डॉन सिस्टर अशा कॅप्शन फोटो ते टाकतात? याबाबत मी ट्वीटरवर फोटो टाकले आहेत. हा फ्लेचर पटेल असलेली लेडी डॉन कोण, असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता. याच लेडी डॉनशी म्हणजेच यासमीन वानखडे यांच्याशी ABP माझाचे प्रतिनिधी सुरज ओझा यांनी केलेली ही खास बातचीत.























