Uddhav Thackeray Kalachowki Full Speech : शेवटची सभा, शेवटचं भाषण, काळाचौकीत ठाकरेंचा निर्धार
Uddhav Thackeray Kalachowki Full Speech : शेवटची सभा, शेवटचं भाषण, काळाचौकीत ठाकरेंचा निर्धार
Uddhav Thackeray on Rahul Shewale : "भाजपकडे उमेदवार नाही, आपलेच गद्दार पोरं घेऊन फिरत आहेत. भारतीय जनता पक्षाला राजकारणात पोरंच होत नाहीत. त्यांना दुसऱ्यांची मुलं पळवावी लागतात. इकडे अनिल देसाईंसारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे. अनिल देसाईंचे राज्यसभेतील व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण समोर जो उमेदवार आहे, त्याचे दुसरे व्हिडीओ तुमच्याकडे आले असतील. रेवण्णा कोण कर्नाटकातला? ज्याच्याकडे फिल्म वगैरे होत्या. तसा इथला उमेदवार आहे समोरचा?", असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. दक्षिण मध्य मुंबईचे मविआचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.























