'इतिहास घडवता येत नाही, ते इतिहास पुसतात'; Saamana च्या रोखठोकमधून Modi Government वर टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2021 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यांना इतिहास घडवता येत नाही, ते लोक इतिहासातील संदर्भ पुसण्यात धन्यता मानतात, अशा शब्दांत सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. भारतात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या आसीएचआर या संस्थेनं आझादी का अमृत महोत्सवच्या पोस्टरवरुन पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा फोटो हटवल्यामुळं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून मोदी सरकारचा समाचार घेतलाय. पंडीत नेहरुंशी वैर का? असा प्रश्नही मोदी सरकारला या सदरातून विचारण्यात आला आहे.