Sanjay Raut : संजय राऊत यांच्या घरी कोरोनाचा शिरकाव, पत्नीसह तीन जणांना कोरोनाची लागण
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील (Maharashtra Government) 12 मंत्र्यांसह विविध पक्षांतील जवळपास 70 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
संजय राऊत यांच्या घरी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राऊत यांच्या आई त्यांची पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोना ची लागण झाली आहे. घरातील सदस्यांना सर्दी ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे या सर्वांची टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये हे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले . या सर्वांना सौम्य लक्षणे असल्यामुळे सध्या तरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.






















