Salman Khan : सलमान खानला संपवण्यासाठी 25 लाखांची सुपारी?
Salman Khan : सलमान खानला संपवण्यासाठी 25 लाखांची सुपारी?
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. याआधीही एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता. आता पोलिस तपासात बिश्नोई गँगने सलमान खानच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रानुसार, सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. सलमान खानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यांच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी म्हटलं आहे की, आरोपींनी सलमान खानला मारण्याची जबाबदारी 18 वर्षांखालील मुलांना दिली होती. सर्व शूटर्स गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोईच्या ऑर्डरची वाट पाहत होते, ऑर्डर मिळताच त्यांनी पाकिस्तानमधून आणलेल्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून सलमान खानवर हल्ला करण्याच्या तयारीत होते, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. हे शूटर पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे येथील असून ते गुजरातमध्ये लपून बसले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. सलमान खानला मारल्यानंतर पळायचा प्लॅनही तयार चार्जशीटमध्ये पोलिसांनी असेही म्हटलं आहे की, सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी स्वतःचा स्किप प्लॅन बनवला होता, त्यानुसार सलमान खानला मारल्यानंतर सर्वांना कन्याकुमारी येथे एकत्र येण्यास सांगण्यात आले, तेथून सर्वांना श्रीलंकेला नेण्यात येणार होतं. भारतीय तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी त्यांना पुढे बोट आणि नंतर श्रीलंकेतून ज्या देशात जायचे होते, तिथे नेण्यात येणार होतं.