एक्स्प्लोर

Sachin Kharat vs Amit Thackeray : ... तर अमित ठाकरेंविरोधात माहीममधून विधानसभा लढण्यास तयार

Mahim Assembly Constituency: मुंबई : जर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) माहीममधून विधानसभा निवडणुकीच्या (Mahim Assembly Constituency) रिंगणात उतरणार असतील तर, मीसुद्धा माहिममधून महाविकास आघाडीतर्फे (Maha Vikas Aaghadi) आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केलं आहे. तसेच, पुढे बोलताना माहिममधून निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहितीही सचिन खरात यांनी दिली आहे. दरम्यान, सचिन खरात यांनी थेट अमित ठाकरेंविरोधात दंड ठोपटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.  

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, मनसेची भूमिका मराठा, दलित, आदिवासी आरक्षण विरोधी आहे. त्यामुळे अशा पक्षाच्या उमेदवाराला आमचा विरोध असणार आहे. त्यामुळेच जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील, तर मी स्वतः माहीम विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तर्फे इच्छुक आहे, तशी मागणी आमचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडे मी करणार आहे.

सचिन खरात बोलताना म्हणाले की, "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण, मनसेची भूमिका मराठा, दलित, आदिवासी आरक्षण विरोधी आहे. त्यामुळे मनसेच्या उमेदवाराला आमचा विरोध असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष हा महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचा मित्र पक्ष म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे. तसेच, महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे जर अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहणार असतील तर, याच मतदारसंघातून अमित ठाकरेंविरोधात मी स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे." 

मुंबई व्हिडीओ

Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Beed : 'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धसांचं जयंत पाटलांना थेट आव्हान
'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धसांचं जयंत पाटलांना थेट आव्हान
Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
Ishwarpur : जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे 'जलदगती'ने निकाल
जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे 'जलदगती'ने निकाल

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget