Ravindra Chavan at Mumbai Goa Highway 'माझा'ची बातमी, मंत्री रवींद्र चव्हाण 'ऑन रोड'
मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा गेले १४ वर्ष त्रास भोगणाऱ्या कोकणवासियांना प्रतीक्षा आहे ती खड्डे विरहित रस्त्याची .... एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर आता राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आलयं.. एबीपी माझाच्या बातमीनंतर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करतायत.... गेल्या १४ वर्षांपासून या महामार्गाचं काम रखडलंय.. त्यातच खड्डेमय महामार्गामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांपुढे विघ्न निर्माण झालं.. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर रवींद्र चव्हाण मुंबई गोवा महामार्गावर पाहणी करत कामगारांना खड्डे बुजवण्यासंदर्भात सूचना देतायत. नागोठणे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी,.....
























