Raj Thackeray Meets Kalpita Pimpale : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांच्या भेटीला Thane
मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. तर कल्पिता पिंगळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. हा भ्याड हल्ला एका अनधिकृत फेरीवाल्याने केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल संताप व्यक्त केला आहे. महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारे अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची हिंमत कशी होते, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पिंपळे यांच्या तब्येतीची चौकशी देखील केली.






















