एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC Budget 2021 | मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार, 'हे' निर्णय होणं अपेक्षित!
अर्थसंकल्प देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केलीय. असं असतानाच उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. कोविड संकटामुळे मुंबईकरांचं कंबरडं मोडलंय आणि महापालिका निवडणूकाही तोंडावर आहेत या पार्श्वभूमीवर मुंबईकरांवर कोणतीही नवी करवाढ लादली जाणार नाही अशी शक्यता आहे. गेलं आर्थिक वर्ष कोविडमध्ये गेल्याने अपेक्षित उत्पन्नाच्या केवळ २५ ते ३० टक्के महसूल आतापर्यंत जमा झालाय. कोरोनावर झालेल्या २ हजार १०० कोटींच्या अतिरिक्त खर्चामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्पात मोठी तूट येण्याची शक्यता आहे. यंदा महापालिकेच्या तिजोरीत आवक कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती आहे. मुंबईत पाचशे चौरस फूटापर्यंतच्या घरांचा केवळ सर्वसाधारण कर माफ झालाय. त्या घरांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ केला जावा अशी मागणी जोर धरतेय.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement