Mumbai : हवामानाचा इशारा देणारा मुंबईतील रडार अजूनही पूर्णपणे कार्यन्वित नाही
एकीकडे संपूर्ण राज्यात विशेषतः कोकणपट्टा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अशा वेळी हवामानााचा अचूक अंदाज मिळाला तर खबरदारी घेणं शक्य होतं. मात्र या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर येतेय. मुंबईतला एस-बँड रडार रिपेरिंग मोडमध्ये असल्यानं अजूनही पूर्णपणे कार्यान्वित नाहीये. मंत्रालयाचे सचिव डॉ माधवन राजीवन यांनी एबीपी माझाला ही माहिती दिले. रडार नादुरुस्त असल्यानं कमी कालावधीत देण्यात येणारे इशारे देणं शक्य होत नाहीये. नव्यानं बसवण्यात येणारं सी-बॅन्ड कार्यान्वित व्हायलाही अद्याप १ महिन्याचा अवधी आहे. मात्र एस बँड रडार अभावी लांब पल्ल्यातील हवामानाचा इशारा मिळणं अवघड झालेलं आहे.))























