एक्स्प्लोर
चोराची पोलिसांच्या हातावर तुरी, शौचालयाच्या खिडकीतून पलायन | ABP Majha
मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एका संशयित आरोपीने चक्क शौचालयाच्या खिडकीतून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पलायन केले आहे.इम्रान खान असे या आरोपीचे नाव आहे. आज सकाळी शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस गोवंडी, शिवाजी नगर भागात गस्त घालत असताना पोलिसांना पटलावरील आरोपी असलेला इम्रान संशयित रित्या विभागात फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि हातकड्या घालून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणले.परंतु त्यानंतर इम्रान ने पोलिसांना त्याला टॉयलेट ला जायचे आहे असे सांगितले.पोलिसांनी त्याला शौचालयात नेले आणि एक हवालदार शौचालयाच्या बाहेर तैनात ठेवला.परंतु या आरोपीने चक्क शौचालय मधील खिडकीच्या काचा आणि गज काढून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेत पलायन केले.ही सर्व घटना समोरच असलेल्या म्हाडा इमारती मधील नागरिकांनी मोबाईल मध्ये कैद केली आहे.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















