एक्स्प्लोर

Sanjay Raut : ईडी, एनसीबी, सीबीआयची चिलखतं उतरवून सामना होऊन जाऊ दे : संजय राऊत ABP Majha

Shivsena Leader Sanjay Raut  : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे भाजपातील राज्यातील नेत्यांसह केंद्रीय नेतेदेखील वैफल्यग्रस्त झाले आहेत. हिंमत असेल तर भाजपने आपल्या 105 आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी असे प्रतिआव्हान शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली होती. शिवसेनेने हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्यावी असे आव्हान दिले होते. त्यावर संजय राऊत यांनी आज प्रतिआव्हान दिले. 

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह यांनी केलेले वक्तव्य असत्याला धरून असल्याचे त्यांनी म्हटले. आमच्या सरकारविषयी, शिवसेनेबद्दल, हिंदूत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप नेत्यांकडून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे.  भाजपचे केंद्रीय नेतेदेखील वैफल्यातून त्यांचीच री ओढत असल्याचे राऊत यांनी म्हटले. सत्ता वाटपाबाबत शिवसेना खोटं बोलत असल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावरही राऊत यांनी टीका केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शाह याच्या उपस्थितीत 50-50 टक्के सत्ता वाटप ठरले होते. पुणे ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यामुळे पुण्यात तरी शाह यांनी खोटं बोलू नये असे राऊत यांनी म्हटले. 

सत्तेसाठी हिंदूत्व सोडले असल्याचे शाह यांनी म्हटले होते. संजय राऊत यांनी त्याचाही समाचार घेतला. सत्तेसाठी 2014 साली शिवसेनेला दूर करा हे सांगणारे कोण होते हे अमित शाह यांनी सांगावे असे प्रतिआव्हान राऊत यांनी दिले. सत्तेसाठी शिवसेनेसोबत युती तोडणारे कोण होते, हे त्यांनी स्पष्ट करावे असेही राऊत यांनी म्हटले. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैसा, केंद्रीय सत्तेने तयार केलेली कृत्रिम लाटदेखील शिवसेनेला रोखू शकली नसल्याचे राऊत यांनी म्हटले.

मुंबई व्हिडीओ

Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
Harshvardhan Sadgir : जेव्हा शासकीय नोकरीची गरज होती पण मिळाली नाही,आज हिमतीनं डबल महाराष्ट्र केसरी बनलो, मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
मला संपल्यात जमा केलेलं, डबल महाराष्ट्र केसरी झालो, आनंदानं मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget