Mumbai Juhu Chowpatty Holi : निर्बंधमुक्त होळी खेळण्यासाठी मुंबईकरांनी सकाळपासूनच जूहूचौपाटीवर धाव
Continues below advertisement
काल दिवसभर होळीचा उत्साह दिसून आल्यानंतर आज राज्यसह देश भरात धुळवडीचा उत्साह दिसून येतोय... धुळवडीची राज्यातल्या वेगवेगळ्या भागात वेगळवेगळी परंपरा दिसून येते... मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागात रंग खेळून धुळवड साजरी होते.. कुठे फुलांची उधळण होते कुठे रंगांची उधळण होते.. तिकडे कोकणात आज शिमगोत्सवात देवाच्या पालख्या मंदिराबाहेर पडण्याची परंपरा आहे... मंदिराबाहेर देवाची साण म्हणजे बसण्याची जागा असते तिथे या पालख्या बसतात अनेक गावात तर धुळवडीच्या दिवशी देव भेटीचा सोहळा असतो... रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी धुळवडीच्या कार्यक्रमात खांद्यावर पालखी घेऊन स्वतः पालखी नाचवली आणि धुळवडीचा आनंद लुटला. यंदा निर्बंधमुक्त होळी खेळण्यासाठी मुंबईकरांनी सकाळपासूनच जूहूचौपाटीवर धाव घेतलेय.. तिथला आढावा घेतलाय निलेश बुधावले यांनी
Continues below advertisement