Mumbai Airport Runway Closed : मुंबई विमानतळाच्या धावपट्ट्या दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या बंद
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या दोन्ही धावपट्ट्या उद्या सकाळी ११ ते ५ या वेळेत दुरुस्तीसाठी बंद राहणार आहेत. पावसाळ्यानंतरच्या कामांसाठी या धावपट्ट्या सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळं विमान उड्डाणांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ शकतो.त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी आपल्या आरक्षित विमानांच्या उड्डाणांबाबत संबंधित विमान कंपन्यांकडून माहिती घ्यावी, असं आवाहन मुंबई विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सध्या ८०० हून अधिक विमानं दररोज मुंबई विमानतळावर उतरतात आणि या विमानतळावरून उड्डाण करतात. मुंबई विमानतळावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची वर्दळ वाढली असून, प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या























