Mhada Home : म्हाडाच्या कोकण मंडळ परिक्षेत्रातील घरांची लॉटरी, 5 हजार 309 घरांसाठी अर्जविक्री

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या वतीनं ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच ३११ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आज सकाळी १०.३० वाजता आयोजित कार्यक्रमात अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होर्ईल. कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये १०१० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत. या योजनांसाठी प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत सात नोव्हेंबर रोजी वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात येईल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola