Lalbaug Raja Daan : लालबागच्या राजाला आतापर्यंत 42 लाख रुपयांच्या रोख रक्कमेचं दान
मुंबईतल्या सार्वजनिक गणपतींमध्ये भाविकांचं सर्वात मोठं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दिवसागणिक भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळं लालबागच्या राजाच्या दानपेटीतल्या रोख रकमेचा आकडा चांगलीच फुगू लागला आहे. या दानपेटीत पहिल्या दिवशी ४२ लाख रुपयांची रक्कम जमा झाली होती. दुसऱ्या दिवशी ती रक्कम ६० लाख ६२ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळं पहिल्या दोन दिवसांत मिळून लालबागच्या राजाच्या चरणी एक कोटी दोन लाख आणि ६२ हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, या दानपेटीत दुसऱ्या दिवशी १८३.४८ ग्रॅम सोनं आणि सहा हजार २२२ ग्रॅम चांदी अर्पण करण्यात आली आहे.
Tags :
Cash Devotees Lalbagh In Mumbai Shraddhasthans Charani Public Ganpat Crowds Of Devotees Day By Day Donation Boxes Figures