Gunaratna Sadavarte Bail Or Jail ? गुणरत्न सदावर्ते यांना जामीन की कोठडी? कोर्टात सुनावणी सुरू
Gunaratna Sadavarte : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची आहे. सदावर्तेंना सात दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. सदावर्तेंचा वकिल आज तिसऱ्यांदा बदलण्यात आला आहे. आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशीला 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंचा जामीनासाठी अर्ज करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता सदावर्तेंन न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.























