Dombivali : डोंबिवलीत हृदयद्रावक घटना, लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
निर्माणाधीन इमारतीच्या खड्ड्यात पडून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीच्या सागाव इथं ही हृदयद्रावक घटना घडलीय. सत्यम मौर्य असं या मुलाचं नाव आहे. सत्यम मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता खेळण्यासाठी बाहेर गेला. दोन तासांनंतरही तो आला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध सुरु केलाय. तासभरानतंरही शोध घेऊन सत्यम सापडला नाही. त्यामुळे त्यांनी नजीकच्या इमारतीमध्ये शोध सुरु केला. त्यामुळे इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात सत्यमचा मृतदेह आढळला. यानंतर सत्यमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. याप्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून निष्काळजीपणा करणाऱ्याविरोधात कारवाईची मागणी होतेय.





















