Mumbai Rape Case : साकीनाका घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश
Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका (Mumbai Sakinaka Rape Case) येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे. दरम्यान यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.























