Bollywood एनसीबीच्या रडारवर... Ananya Pandey ची आज पुन्हा चौकशी होणार, आणखी बॉलिवूड स्टार अडकणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCB Questioning Ananya Pandey : क्रूझ ड्रग्स केस प्रकरणी गुरुवारी एनसीबीनं बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापा टाकत, सर्चऑपरेशन केलं. त्यानंतर एनसीबीनं अनन्या पांडेला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. काल अनन्या एनसीबी कार्यालयात वडिल चंकी पांडे यांच्यासोबत चौकशीसाठी संध्याकाळी 4 वाजता पोहोचली होती. जवळपास दोन तासांपर्यंत अनन्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी आज उपस्थित राहण्याबाबत अनन्याला पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे आज पुन्हा अनन्याला एनसीबीच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार आहेत.
सध्या बॉलिवूड एनसीबीच्या रडारवर आहे. मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी गेल्या 18 दिवसांपासून बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खान अटकेत आहे. अशातच काल (गुरुवारी) शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन आर्यन खानची 10 मिनिटांसाठी भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री आणि अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेच्या घरी एनसीबीनं छापा टाकत झाडाझडती घेतली. एवढंच नाहीतर दुपारी दोन वाजता चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स बजावलं होतं. जवळपास दोन तास अनन्याची चौकशी करण्यात आली होती.