Jagdish Lad : मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनानं निधन, 34व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Jagdish Lad : मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनानं निधन, 34व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
तुम्ही जर स्वत:ला फिट समजत असाल तर थोडं थांबा, कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण तुम्ही म्हणत असाल की मी फिट आहे माझी चांगली बॉडी आहे तर असं नाही. बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं निधन झालं. जगदीश अवघ्या 34 वर्षाचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या जगदीशने गेल्या वर्षी बडोद्यात व्यायमशाळा सुरु केली होती. त्यानिमित्ताने तो बडोद्यात असायचा. गेल्या काही दिवसांपूर्वी जगदीशला कोरोनाची लागण झाली होती. अखेर त्याचं निधन झालं.





















