BDD Redevelopment Police Homes : 2011 नंतरच्या पोलिसांना घर मिळणार नाही, BDD चाळीतील कुटुंबात संतापाची लाट?
BDD Redevelopment Police Homes : 2011 नंतरच्या पोलिसांना घर मिळणार नाही, BDD चाळीतील कुटुंबात संतापाची लाट?
बीडीडी चाळींचा पुनर्विकास होत असताना 1 जानेवारी 2011 पर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पात्र करत त्यांना पुनर्विकास प्रकल्पात सहभागी केल जाणार आहे. मात्र दादर नायगाव आणि वरळी या परिसरामधील बीडीडी चाळींमध्ये 2 जानेवारी 2011 नंतरच्या पोलीस कुटुंबीयांना घर मिळणार नाहीत. त्यामुळे असे 200 पोलीस कुटुंबीय सध्या आम्हाला घर मिळेल का घर अशी साद सरकारकडे घालत आहेत. सरकार दरबारी गेल्या वर्षभरापासून हा प्रश्न ते मांडत आहेत. मात्र तरीही हा त्यांचा प्रश्न सोडवला जात नाही, त्यामुळे पोलीस कुटुंबीय संतप्त आहेत.























