MCA Elections : MCAच्या रणांगणात आशिष शेलार यांच्याकडून मतदारांना तीन आश्वासनं
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत आज क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी असा सामना पाहायला मिळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आज होणाऱ्या निवडणुकीत 380 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अध्यक्षपदासाठी माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचा सामना पवार-शेलार पॅनलचे उमेदवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीत पवार-शेलार पॅनलमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची टीम दिसली. निवडणुकीच्या आधी रणनीतीसाठी काल या पॅनलचे सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर दिसले. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या पॅनलमधून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि निलेश भोसले, शिंदे गटाचे विहंग सरनाईक हेदेखिल रिंगणात आहेत... आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या























