एक्स्प्लोर

Anil Deshmukh : अनिल देशमुख प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब नोंदवणार : सूत्र

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आज सकाळी अकरा वाजेपर्यंत ईडीनं त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. परंतु, आजही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याची माहिती सुत्रां कडून मिळत आहे. देशमुखांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर सध्या वकीलांची खलबतं सुरु आहेत. गृहमंत्री असताना देशमुख ज्ञानेश्वरी या बंगल्यावर राहत होतो. मात्र सध्या ते तिथेच असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळत आहे. आज सकाळपासूनच अनेक वकील ज्ञानेश्वरी या बंगल्यावर दाखल होत आहेत. 

शुक्रवारी ईडीचं धाड सत्र संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी ईडीनं समन्स बजावलं होतं. परंतु, शनिवारी दिलेल्या नोटीशीनंतर अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार ईडीनं अनिल देशमुख यांना आज (मंगळवारी) चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. परंतु, आजही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती, सुत्रांकडून मिळत आहे. तसेच अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर वकिलांची खलबतं सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 

अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, "काही कागदपत्रे घेऊन यायची आहेत. हे ईडीने सांगितले नाही. आता मी ईडी कार्यालयात जाऊन काय कागदपत्रं मागितली आहेत, हे पाहणार आहे.  अजून कोर्टात जामीनासाठी गेलो नाही. कागदपत्रे मिळाल्यानंतर अनिल देशमुख आज ईडी समोर जाण्याची शक्यता आहे. मात्र अनिल देशमुखांकडून ईडीला जे पत्र देण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते प्रत्यक्षात चौकशीला हजर राहू शकत नाही. तर व्हिडीओच्या माध्यमातून ते चौकशीला हजर राहतील. मात्र त्याआधी ईडीने संबंधित प्रश्नांची यादी आणि त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे दाखवावी."

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले होते. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु होती. अनिल देशमुख ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी होते. यावेळी देशमुख आणि त्यांची मुलगी बंगल्यावर होते. दरम्यान, वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाला असून दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे स्टेटमेंट घेण्यात आले. 

ईडीकडून शुक्रवारी 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवास्थानी धाडी टाकण्यात आल्या होत्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर रात्री उशीरा त्यांना अटकही करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागून अगदी एक एक ड्रॉवर परत तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथुन देशमुख वरळीच्या घरी पोहोचले. 

मुंबई व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs DC Live Score IPL 2026 : राजस्थानने दिल्लीसमोर ठेवले 226 धावांचे लक्ष्य, रियान परागनंतर फरेराने घातला तांडव! स्टार्कने घेतले 3 विकेट्स
RR vs DC Live Update : राजस्थानने दिल्लीसमोर ठेवले 226 धावांचे लक्ष्य, रियान परागनंतर फरेराने घातला तांडव! स्टार्कने घेतले 3 विकेट्स
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
भावूक होऊन नाही तर मेरिट पाहून निर्णय घेतलाय, अमोल मिटकरींचा गैरसमज झालाय, विधानपरिषद उमेदवारीवरुन मंत्री भरणेंचं सप्ष्टीकरण
भावूक होऊन नाही तर मेरिट पाहून निर्णय घेतलाय, अमोल मिटकरींचा गैरसमज झालाय, विधानपरिषद उमेदवारीवरुन मंत्री भरणेंचं सप्ष्टीकरण
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम

व्हिडीओ

Avinash Jadhav on Gunratna Sadawarte : एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे खाणाऱ्या सदावर्तेला जेलमध्ये पाठवणार
Mumbai Pune Express way traffic jam : 1,2,3,4,5..एक्स्प्रेस वेवर धडाधड गाड्या बंद, धडकी भरवणाराVIDEO
Amol Mitkari Akola : उमेदवारी नाकारतांना विश्वासात घेण्याचं सौजन्यही दाखवलं नाही
Bachchu Kadu Raigad : शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली!राजकीय प्रवासावर बच्चू कडूंचा नवा 'प्लॅन'
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
Embed widget