Andheri Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे- शिंदे गटात आक्षेप पे आक्षेप,दोन्ही गटांकडून सावध पावलं
अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे आणि शिंदेंच्या लढाईत आक्षेपांची मालिका उभी राहिली आहे... अंधेरीतल्या रणसंग्रामात एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी कुठलीही संधी दोन्ही बाजूनं सोडली जात नाहीए.... शिवाय या लढाईत आता इतरांनीही उडी घेतलीए... म्हणजे ठाकरेंच्या चिन्हावर तिसराच पक्ष आक्षेप घेतोय.. तर शिंदेंच्या चिन्हावर चौथाच पक्ष दावा सांगतोय... आता यामुळे आक्षेपांचं हे सत्र सुरुच आहे... एकीकडे या लढाईत एक छोटी चूक पराभवाकडे नेणार असल्याची कल्पना दोन्ही गटांना आहे.. त्यामुळे सावध पावलं दोन्ही गटांकडून उचलली जात आहेत... आणि दोन्ही बाजूनं विरोधी उमेदवाराची एक चूक टिपण्याचा प्रयत्न होतोय... बर यात नुसती चूक शोधली जात नाहीए त्यामुळे घेतली जाणारी आक्षेप ही लढाई आणखी तीव्र करतायत....























