एक्स्प्लोर

Aditya Thackeray : पुरेशी लस मिळाली तर तीन आठवड्यात मुंबईचं लसीकरण शक्य : आदित्य ठाकरे

मुंबई : जगभरातील इतर देशांकडून कोरोनाची लस खरेदी करता येते का त्याची चाचपणी सुरु आहे. हे जर शक्य झालं तर केवळ तीनच आठवड्यात संपूर्ण मुंबईचे लसीकरण करण्याचे नियोजन तयार असल्याचं पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. आदित्य ठाकरे यांनी एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली होती, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने या लसींची जागतिक पातळीवरुन खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. शहरातील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, "सध्या कोरोना प्रतिंबधक लसीसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधीत ॲपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसेच जे कोविन अॅप ऑपरेट करू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत."

मुंबईची लसींची अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याचे आमचे प्रयत्न सतत चालू आहेत. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी झाल्याने आता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.   

गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही आज महापालिकेने जारी केल्या आहेत, अशी माहितीही मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

राज्यातीतील इतर सर्व शहरांनीही 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभरित्या लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी, असे आवाहनही मंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे.

मुंबईचे लसीकरण तीन आठवड्यात करण्याचे नियोजन तयार असल्याच्या आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "मुंबई महाराष्ट्राचा भाग आहे. त्यात लसीकरणाचा वेगळा विषय होणार नाही. राज्याच्या लसीकरणाबाबत योग्य तो निर्णय होईल."

मुंबई व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO
Mandar Kiwale Case: मंदार किवळेची 50 हजारांची सुपारी; मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी, अक्षय चव्हाणच्या घरीच प्लॅनिंग ठरलं, आदल्या दिवशी बैठक अन् दुसऱ्या दिवशी कोर्टाबाहेर गाठलं
मंदार किवळेची 50 हजारांची सुपारी; मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी, अक्षय चव्हाणच्या घरीच प्लॅनिंग ठरलं, आदल्या दिवशी बैठक अन् दुसऱ्या दिवशी कोर्टाबाहेर गाठलं

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
Embed widget