एक्स्प्लोर

Nagpur Accident | अल्पवयीन दुचाकीस्वाराची खेळाडूला धडक; राज्यस्तरीय धावपटू मयुरी पटले गंभीर जखमी

नागपूर : नागपूरसह राज्यातील इतर मोठ्या शहरात बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या बाईकर्सचा धुमाकूळ नवीन नाही. मात्र, अशाच मस्तवाल बाईकर्सनी नागपुरात एका राज्यस्तरीय धावपटूला मृत्यूच्या दाढेत ढकललं आहे. अल्पवयीन दुचाकी चालकांनी एकमेकांशी शर्यत लावून मयुरी पटलेला गंभीर जखमी केलं असून सध्या रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्यामुळे पोलीस आणि कायदा अशा मस्तवाल बाईकर्सला धडा केव्हा शिकवेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अठरा वर्षांची मयुरी पटले. खेळाच्या मैदानातून स्वतःचा आणि गरीब आई वडिलांच्या स्वप्नांना बळ देण्याचा प्रयत्न करणारी नागपूरची तरुणी. मात्र, सध्या ती मृत्यूच्या दाढेत पोहोचली आहे. किंबहुना ढकलली गेली आहे. आणि तिच्या या अवस्थेसाठी बेदरकारपणे दुचाकी चालवून इतरांचा जीव धोक्यात टाकणारे दोन अल्पवयीन वाहन चालक कारण ठरले आहेत.

मयुरी खेलो इंडिया या केंद्र सरकारच्या तरुण खेळाडूंसाठीच्या स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळण्यासाठी लवकरच भोपाळला जाणार होती. त्यासाठीच 9 फेब्रुवारीच्या सकाळी आपली प्रमाणपत्रं कोच हरेंद्र ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी मयुरी दाभा गणेशनगर मार्गाने जात होती. तेवढ्यात समोरून एकमेकांशी दुचाकीची शर्यत लावत वेगानं दुचाकी चालवत आलेल्या दोन अल्पवयीन दुचाकी स्वारांनी मयुरीच्या दुचाकीला जबर धडक दिली. मयुरी रस्त्यावर फेकली गेली. त्यात तिच्या डोक्याला, मेंदूला, डोळे, नाक, हातपाय, पाठीला जबर दुखापत झाली. अनेक हाडं मोडली गेली.

तिला लगेच वाडी परिसरातल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं गेली दोन दिवस ती शुद्धीवर आलेली नाही. मयुरीच्या अपघातानंतर तिचे वडील ही जबर मानसिक धक्क्यात आहेत. वाहनचालक असलेले वडील आणि मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या मयुरीच्या आईने पोटाला चिमटा घेत आजवर मयुरीला मैदानात पाठविलं. आणि मयुरीने ही अनेक वर्षे घाम गाळला. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आता जेव्हा राष्ट्रीय स्तरावर तिला संधी मिळण्याची वेळ आली, तेव्हा स्वतःच्या मस्तीसाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या मस्तवाल तरुणांमुळे तिचं स्वप्न धोक्यात आलं आहे. त्यामुळे अशा मस्तवाल धनिकपुत्रांना आणि त्यांच्या पालकांना धडा शिकवण्याची गरज असल्याची मागणी मयुरीच्या आई कविता पटले यांनी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी अपघात प्रकरणी दोन्ही वाहन चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, मात्र ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांना दुचाकी सोपवून इतरांना धोक्यात घालणाऱ्या त्यांच्या पालकांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याची माहिती गिट्टीखदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली आहे.

मयुरीच्या मेंदूला मागील बाजूस जबर इजा झाल्यामुळे सध्या ही तिची स्थिती धोक्यात आहे. गेले दोन दिवस ती शुद्धीवर नाही, त्यामुळे पुढील काही दिवस तिच्यासाठी अत्यंत धोक्याचे आहेत. त्यानंतर ही ती पुन्हा आपल्या पायावर उभी राहून मैदानावर पोहोचेल आणि महाराष्ट्रासाठी मेडल्स जिंकेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या तरी तिला सर्वांच्याया प्रार्थनेची आणि रुग्णालयाच्या लाखोंच्या खर्चासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

बातम्या व्हिडीओ

Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
IND vs NZ 4th ODI : दोन झेल सोडले अन् टीम इंडियाचं वाटोळं! रोहित-इशानच्या चुकीचा विल यंगने घेतला बदला, सगळ्यांना धू धू धुतलं अन् ठोकलं शतक
दोन झेल सोडले अन् टीम इंडियाचं वाटोळं! रोहित-इशानच्या चुकीचा विल यंगने घेतला बदला, सगळ्यांना धू धू धुतलं अन् ठोकलं शतक
Raj Thackeray on Chhath Puja : भाजपकडून मुंबईत छठपूजेवरुन मराठी Vs उत्तर भारतीय संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, म्हणाले, 'भाजपने देशाची वाट लावलेय'
भाजपकडून मुंबईत छठपूजेवरुन मराठी Vs उत्तर भारतीय संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, म्हणाले, 'भाजपने देशाची वाट लावलेय'

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
Embed widget