Majha Maharashtra Digital Maharashtra | अभिनेते श्रेयस तळपदे याचं भाषण
मुंबई : एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र' या कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, अभिनेता श्रेयस तळपडे, रणजित डिसले सर उपस्थित होते. एबीपी माझाच्या ब्लॉग माझा स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत प्रथम पुरस्कार यशोधन जोशी आणि कौस्तुभ मुद्गल यांना, द्वितीय अनिल गोविलकर, तर तृतीय क्रमांक नितीन साळुंखे, अमोल कुलकर्णी यांना मिळाला आहे. आज एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या कार्यक्रमात या पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी कवी, साहित्यिक बालाजी सुतार तसेच लेखक ह्रषिकेश गुप्ते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.























