Varun Sukhraj on Pahalgam :पहलगाम,काश्मिरी लोकांवर डॉक्यूमेट्री तयार करण्याचा वरूण सुखराजांचा निर्णय
Varun Sukhraj on Pahalgam :पहलगाम,काश्मिरी लोकांवर डॉक्यूमेट्री तयार करण्याचा वरूण सुखराजांचा निर्णय
हे ही वाचा..
पहलगाममध्ये झालेल्या पर्यटकांवरील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर (deadly terror attack in Pahalgam) भारताकडून कडक कारवाईसाठी पडद्यामागून तयारी सुरु असली, तरी तत्पूर्वी पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरुच ठेवली आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असल्याने भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर (India banned import of all goods coming from or passing through Pakistan) बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने 2 मे रोजी एका सूचनेत म्हटले आहे की ही बंदी तत्काळ लागू होईल. भारत सरकारने परराष्ट्र व्यापार धोरण, 2023 मध्ये एक नवीन परिच्छेद 2.20 अ समाविष्ट केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमधून आयात करण्यावर बंदी असे म्हटले आहे. सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो वा नसो, पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने प्रतिबंधित करण्यात आली आहे. या निर्बंधातील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल, असे डीजीएफटीने (Directorate General of Foreign Trade) आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.




















