Uddhav Thackeray : भावना गवळींच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार, 12-13 मार्चला वाशिम दौऱ्यावर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे दोन दिवस यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात
अँकर: शिवसेनेचे उद्धव ठाकरेंची 12 आणि 13 मार्चला यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात पदाधिकारी बैठक आणि संवाद मेळावे घेण्यासाठी येणार आहे. 12 मार्चला राळेगाव येथे दुपारी 12 वाजता तर पुसद येथे सायंकाळी 6 वाजता संवाद मेळावा घेणार आहे. 12 मार्चला माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या घरी मुक्काम राहणार आहे. तसेच 13 मार्चला वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे 12 वाजता तर सायंकाळी 6 वाजता वाशीम येथे मेळावा घेणार आहे. शिंदे गटात गेलेल्या खासदार भावना गवळी यांचा हा मतदार संघ असून या चारही ठिकाणी उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडणार आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघासाठी ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांची उमेदवारी निश्चित. उद्धव ठाकरे 12 आणि 13 मार्च अशा दोन दिवसाच्या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर, राळेगाव, पुसद, कारंजा येथे उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा.