Zero Hour Israel vs lebanon : लेबनॉनवर इस्त्रायलचे हल्ले; हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्लाचा खात्मा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंतरराष्ट्रीय राजकारणातील ज्वालामुखी म्हणून ओळखला जाणारा पश्चिम आशिया पुन्हा धगधगतोय. गेलं वर्षभर गाझा पट्टीवर हल्ले करणाऱ्या इस्रायलनं काही दिवसांपासून आपलं लक्ष आता लेबनॉनवर केंद्रित केलंय. हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेला मूळापासून संपवणं हे इस्रायलचं लक्ष आहे. गेल्या तीन दिवसांत हिजबुल्लाचं नेतृत्व म्हणून ज्यांची गणना होते, त्या १३ पैकी १० म्होरक्यांना इस्रायलनं संपवलं. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्होरक्या म्हणजे हिजबुल्लाचा सरचिटणीस आणि सर्वेसर्वा हसन नसरल्ला. तो तर जमिनीखाली ६० फुटावर एका बंकरमध्ये बैठक घेत असताना मारला गेला. हिजबुल्ला याचा बदला घेईल, आम्ही जमिनी हल्ले करण्यास सज्ज आहोत, अशी गर्जना आज हिजबुल्लाचा उपाध्यक्ष शेख नईम कासिमनं केली.
हा सगळा तपशिल आपण पाहणार आहोत, मात्र त्याआधी जाणून घेण्यासारखी बाब म्हणजे हिजबुल्ला या संघटनेमागे इराण आहे. इराण हा इस्रायलचा कट्टर शत्रू. मात्र आर्थिक निर्बंधांमुळे आर्थिकदृष्ट्या खिळखिळा झालेला इराण इस्रायलविरोधात प्रत्यक्ष युद्ध छेडू शकत नाही. म्हणून मग जसं पाकिस्तान अनेक दहशतवादी संघटनांच्या मार्फत भारताच्या खोड्या काढत असतो, तसंच हमास, हिजबुल्ला आणि हूथी या तीन संघटनांद्वारे इराण पडद्यामागून इस्रायलला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
सध्या लेबनॉनमध्ये काय सुरू आहे? इस्रायलची पुढची रणनीती काय असेल? या हल्ल्यांमुळे हिजबुल्ला खरंच संपेल का, आणि भारतावर या सगळ्याचा काय परिणाम होईल... हे सगळं आपण या सत्रात पाहणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता? त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला.