ABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

मराठा आरक्षणाबाबत ५४ लाख पुरावे असलेला शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, आणखी काय पुरावे हवेत, जरांगेंचा सवाल

मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्यातील मेट्रो, भुयारी मार्गांच्या प्रकल्पांसाठी मोठी तरतूद तर रमाबाई आंबेडकरनगर, कामराज नगरच्या पुनर्विकासाला गती देण्याचा निर्णय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर..  शिंदे, फडणवीस आणि अजितदादांसोबत रात्री खलबतं... 

मविआच्या बैठकीत विदर्भातल्या बहुतांश जागांवर चर्चा, आव्हाडांची माहिती..पितृपक्षानंतर जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता... उद्या पुन्हा बैठक...

सदोष गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा तर सरकारच्या निर्णयामुळे महिला बचत गटाला रोजगार मिळाल्याचा केसरकरांचा दावा

गेल्या दीड वर्षांपासून घाटकोपरच्या पंतनगर पोलीस वसाहतीत दूषित पाण्याचा पुरवठा.. सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनावस्थेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात. 

कोल्डप्लेच्या तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप, बुक माय शो वादाच्या भोवऱ्यात, नोटिशीला उत्तर देण्याऐवजी सीईओची मंत्र्यांच्या भेटींसाठी धावाधाव

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, ८ ऑक्टोबरला डिस्को डान्सरचा होणार सन्मान

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram