Uddhav Thackeray PC : तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला, ठाकरेंचं शाहांना जशास तसं उत्तर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray PC : तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला, ठाकरेंचं शाहांना जशास तसं उत्तर
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. या लढाईत उद्धव ठाकरे विरुद्ध अमित शाह यांच्यातील लढाई चांगलीच रंगतदार होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील सभेत बोलताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फुटला, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामना हारला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना लगावला. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. ते सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.