Thackeray VS Shinde SC Decision : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर या प्रश्नांची उत्तर मिळणार?
abp majha web team
Updated at:
09 May 2023 07:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही दिवसांवर आहे... सुप्रीम कोर्ट कुणाच्या बाजूनं निकाल देणार याकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागलंय... 9 ते ११ मे दरम्यान सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता आहे...दरम्यान त्याआधीच राजकीय विधानांमुळे निकालाचा सस्पेन्स आणखी वाढतोय... राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनच दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन असं म्हणाले... त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा थेट संबंध कोर्टाच्या निकालाशीच जोडला जातोय... ज्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुख्य मुद्दा कोर्टासमोर आहे... त्या १६ पैकी एक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत... त्यामुळे निकालात नेमकं काय होणार याबाबत तर्कवितर्क सुरु आहे