Cold Play Special Report : कोल्डप्ले बॅण्डचा कार्यक्रम; घोटाळ्याचे आरोप

Continues below advertisement

ब्रिटिश रॉक बॅण्ड कोल्डप्ले १८ जानेवारीला नवी मुंबईत येतोय... त्याच्या तिकिटांची मागणी एवढी आहे, की बूक माय शोची वेबसाईट क्रॅश झाली... आता या तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत बुक माय शोला चारी बाजूंनी घेरलं गेलंय... पाहूयात, कोल्डप्लेच्या तिकिटावरून राजकारण कसं गरम झालंय... या स्पेशल रिपोर्टमधून...  कोल्ड प्ले... ब्रिटिश पॉप-रॉक बँड... सध्या कोल्ड प्लेवरून राज्यातलं वातावरण मात्र चांगलंच हॉट झालंय... त्याचं कारण म्हणजे त्याच्या तिकीट विक्रीवरून झालेले घोटाळ्याचे आरोप... आणि त्यात भर पडलीय ती म्हणजे आजच्या आणखी एका ड्राम्याची...  हा जगविख्यात बँड 18, 19 आणि 21 जानेवारी 2025 ला नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम मध्ये परफॉर्म करणार आहे. बुक माय शो या साईडवरून त्याची तिकीटविक्री सुरू झाली, मात्र याच तिकीट विक्रीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय...  याच प्रकरणी बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानी यांना आर्थिक गुन्हे शाखेनं दोनदा समन्स बजावलंय...  पण चौकशीला हजर राहायचं सोडून आशिष हेमराजानी हे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचलेले दिसले... आणि त्याचवेळी फडणवीसांनी मात्र त्यांना भेटण्यासाठी सपशेल नकार दिला...  हे सगळं घडत असताना हेमराजानी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यातून मात्र सुटू शकले नाहीत. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाल्यावर आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला मात्र त्यांनी माझाचाच कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न करत तिथून काढता पाय घेतला...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram