Maratha Protestant on Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप
Maratha Protestant on Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप बातमी आहे लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये झालेल्या वादाची. पुण्यातल्या कातरस कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये तुफान वाद झाला. लक्ष्मण हाकेंनी मद्यपराशन करून वाद घातल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला. वादानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. यामुळे पोलीस स्टेशन बाहेर काही काळ गोंधाळाच वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर लक्ष्मण हाकयांची ससुन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता प्राथमिक अहवालात त्यांनी मद्यप्राशन केलं नसल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाकेंच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्याचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात. तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र हाकेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान लक्ष्मण हाके हे एका कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झालेत. तर आपल्याला जिवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता असा आरोप लक्ष्मण हाके. समाजाच्या कडून त्या काही व्यक्ती आलेले त्यांच्या म्हणण आहे यांनी दारू पिलेले होते आणि काहीतरी बोलत होते शिविघाल केली आम्हाला मारण्याची धमकी देत होते म्हणून आता दोन्ही आमच्याकडे आमच्या समोर आहे त्यांच्या दोघांच्या स्टेटमेंट घेत आहे त्यांच्या सविस्ता स्टेटमेंट घेऊन त्यांच्या मननाप्रमाणे आम्ही पूर्णपणे चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करणार आहे. आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत. मंदार काल हा जो गोंधळ झाला त्याचा घटनाक्रम नेमका कसा होता? आणि हाकेंच्या वैद्यकीय अहवालात नेमक काय सांगितलं गेल? गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलक आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये वाद सुरू आहे. कालपर्यंत हा वाद समाज माध्यमांमधून माध्यमांमधून आपण सगळे पाहत होतो मात्र काल संध्याकाळी लक्षुमन हाके एका त्यांच्या परिचित परिचितांकडे त्यांच्या मित्रांकडे गेले असता त्या ठिकाणी काही मराठा समाजाचे आंदोलक पोहोचले आणि संभाजी राजेंबद्दल लक्ष्मण हाके यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा हाके यांना जाब विचारण्यात. आणि तिथून वादाला सुरुवात झाली. संध्याकाळी सात: सा:30 च्या दरम्यान या सगळ्या वादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर या वादामधूनच लक्ष्मण हाके यांनी दारू पिल्याचा आरोप त्यांच्या सोबत ज्यांचा वाद सुरू होता त्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी केला. हा वाद वाढत गेला आणि त्यानंतर हे सगळे दोन्ही बाजूचे लोक या कोंढवा पोलीस स्टेशनला आले आणि कोंढवा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत या सगळ्या दोन्ही बाजूंकडून एकमेकांसोबत एकमेकांसोबत वाद घालण्यात आला. एकमेकांच्या विरोधामध्ये. देण्यात आल्या आणि खास करून लक्ष्मण हाके यांनी दारू पिलेली आहे असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आणि त्यांची वैद्यकीय चाचणी पोलिसांनी करावी डॉक्टरांच्या मार्फत असं अशी मागणी जी होती ती मराठा समाजाच्या आंदोलकांची होती. त्यानंतर लक्ष्मण हाके यांना पोलीस ससन रुग्णालयमध्ये घेऊन गेले. त्यांच ब्लड सॅम्पल असेल, युरीन सॅम्पल असेल हे पोलिसां डॉक्टरांनी कलेक्ट केलं. मात्र जो काही प्राथमिक निष्कर्ष आहे डॉक्टरांनी त्यांचे डोळे तपासले किंवा त्यांचे. इतर सगळ्या शरीराची तपासणी केली असता लक्ष्मण हाके यांनी प्राथमिक दृष्ट्या दारू पिलेली नाही असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला मात्र त्यांच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने हे पुढच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत त्याचा आहवाल येण्यासाठी आणखी एक ते दोन दिवस लागणार आहेत त्यानंतर या सगळ्या तपासणीनंतर लक्ष्मण हाके पहाटेच पुण्याहून नागपूरला रवाणा झालेले आहेत विमान आणि तिथे त्यांचा कार्यक्रम आहे.