TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 ऑगस्ट 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 ऑगस्ट 2024 : ABP Majha
राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरुन आज महाविकास आघाडीचे आंदोलन, आदित्य ठाकरेही मालवणला जाऊन आंदोलनात सहभागी होणार.
मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद पवार पक्ष आक्रमक, आज भिगवण चौकात सुप्रिया सुळे करणार आंदोलन
खासदार नारायण राणे आज राजकोट किल्ल्यावर जाणार, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार.
समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, तर यावर कुणीही राजकारण न करण्याचं, फडणवीसांचं आवाहन.
शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अपमानाविरोधात राष्ट्रवादी मैदानात, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज घटनास्थळी जाणार.
आप-आपल्या शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाराजांची जाहीर माफी मागा. जितेंद्र आव्हाड यांचं मविआच्या कार्यकर्त्यांना आवाहन.
आज छत्रपती संभाजी महाराज असते तर भ्रष्टाचारी लोकांचा उजवा हात आणि डावा पाय निकामी केला असता, पुतळा उभारतांना कोणी पैसा खाल्ला असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे, अमोल मिटकरींची टीका.