Tejaswini Pandit Ek Number Movie : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTejaswini Pandit Ek Number Movie : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमा
अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि वरदा नाडियाडवाला यांची निर्मिती असलेल्या येक नंबर या मराठी चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या १० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या टीझरमधल्या पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी साधर्म्य असलेला एक चेहरा दिसतो. त्यामुळं या चित्रपटाविषयी आधीच कुतूहल निर्माण झालं होतं. आणि दुसऱ्या टीझरनं चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. कारण नव्या टीझरच्या सुरुवातीला प्रचंड जनसमुदायाचा प्रतिसाद लाभलेली सभा दिसते. त्या सभेतून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राला ओळखीचा असलेला भारदस्त आवाज कानावर पडतो. आणि दुसऱ्या क्षणी दंगल, मारामारी, जाळपोळीची दृश्यं दिसत असून 'ठाकरे साहेब' असा हलकासा आवाजही ऐकू येतो. धैर्य हा नव्या दमाचा तरुण अभिनेता या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या रुपानं मराठी चित्रपटाला आजच्या जमान्याचा अँग्री यंग मॅन लाभणार असं बोललं जात आहे.